उमविला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव

0

नागपूर : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतच्या विधेयकाला आज विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत विधेयक सभागृहात मांडले. .

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये बोली भाषा वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून विद्यापीठाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या कवितेमधून जो माणूस अपेक्षित होता तो या विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

पुणे विद्यापीठाला ज्याप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईचे नाव देणे ही अभिनंदनीय बाब असून हा महिला वर्गाचा सर्वोच्च सन्मान असून या विधेयकाला माझा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज सभागृहात विधेयकावर चर्चा करतांना सांगितले.

छगन भुजबळ म्हणाले की, बहिणाबाई यांचे नाव जळगाव विद्यापीठाला देणे ही महत्त्वाची बाब आहे. हा नारी शक्तीचा सन्मान आहे. आपल्या संस्कृतीने महिलांना वेगळ्या दर्जाचे स्थान दिले मात्र समाजाने महिलेला सन्मान दिला आहे. त्यात सरकारने हे विधेयक आणले म्हणून मी आनंदी आहे. त्यामुळे सरकारचे अभिनंदन करत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*