धरणातल्या पाण्याची मोजणी कशी करावी ?

0

सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक धरण पुरेसे भरले आहे. त्यामुळे काही ठिकाणी धरणातून पाण्याचं विसर्ग देखील होताना दिसत आहे. ते धरण इतके टीएमसी ( TMC) भरल्यामुळे त्यातून इतके क्युसेक (Cusec ) पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपल्याला ऐकायला मिळतात. शब्दप्रयोगांचे अर्थ आपणास माहिती आहे का ? साधारण अशावेळी खालील प्रश्न पडतात ?

1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??
2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??
3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??

सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे. इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण बातम्यांमधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???

आपणास फक्त “लिटर” ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.

पाणी मोजण्याची एकके

१) स्थिर पाणी मोजण्याची एकके –
१) लिटर
२) घनफूट
३) घनमीटर
४) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)

एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.

१ टीएमसी = २८,३१६,८४६,५९२ लिटर्स

२) वाहते पाणी मोजण्याची एकके-

१) १ क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात २८.३ लिटर पाणी बाहेर पडते.

२) १ क्युमेक (Cumec) – एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात १००० लिटर पाणी बाहेर पडते.

उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी आहे.
म्हणजेच त्यामध्ये १.९७ x २८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.

याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे.
म्हणजेच ५०० x २८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली ०५ धरणे : 

१)उजनी ११७.२७ टीएमसी
२)कोयना १०५.२७ टीएमसी
३)जायकवाडी ७६.६५ टीएमसी ( पैठण )
४)पेंच तोतलाडोह ३५.९० टीएमसी
५) पूर्णा येलदरी २८.५६ टीएमसी

LEAVE A REPLY

*