द्राक्ष बागेत ओलांड्यावर मुळ्या फुटल्यास करा ह्या उपाय योजना

0

विविध अवस्थांतील द्राक्ष बागेचा विकास हेच एक आपले ध्येय असते. अशा वेळी आपण बागेत प्रत्येक गोष्टीचा अवलंब करतो; परंतु अशा परिस्थितीत सर्व उपाय योजना एकाच वेळी केल्यास कोणत्याही गोष्टीचा फारसा उपयोग होत नाही. सध्या पावसाळी वातावरण असल्याने काळ्या कसदार जमिनीमध्ये द्राक्ष बागेत वेलीच्या ओलांड्यावरती मुळ्या फुटण्याची लक्षणे दिसत असतात. या बोंदामध्ये वेलीची सडलेली मुळे असल्याने त्या ठिकाणी नवीन मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळे ओलांड्यावरती नवीन मुळे फुटून येत असतात. यास कारणीभूत बागेतील पावसाळी वातावरणात असलेला दमटपणा होय.

पावसाची शक्यता किवा ढगाळ वातावरण किवा पाऊस पडला आहे, अशा स्थितीत प्रामुख्याने बागेत पाणी साठणे, निचऱ्याची समस्या निर्माण होणे, नवीन फुटींची अनियंत्रित वाढ होणे या समस्या उद्भवतात. यामुळे मिळणाऱ्या अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो, परिणामी काडी पक्वतेमध्ये उशीर होतो. मशागतीच्या कामात अडचणी येतात. बागेत पाणी साठल्यामुळे जमिनीत वाफसा स्थिती राहत नाही.

सध्या पाऊस जोरदार असल्याने द्राक्ष शेतकऱ्यांनीबागेत पाणी साचू न देता असणाऱ्या पाण्याचा निचरा आवश्यक पणे करून घ्यावा. निचरा न होण्याची समस्या भारी काळ्या जमिनीत दिसून येते. भारी काळ्या प्रकारची जमिनी मुख्यत; नाशिक विभागात आहे. त्यामुळे ह्या भागात पावसाळी हंगामात वेलीवर मुळे फुटल्याची परिस्थिती दरवर्षी दिसून येते.

जर अशी परिस्थिती बागेत असेल तर पुढील उपाय योजना कराव्यात :

1. पावसाळ्यात जमिनीत वाफसा स्थिती कशी राहील यासाठी प्रयत्न करावे. खरड छाटणी करतेवेळी मलचिन्ग असल्यास अशा वेळीस फायदा होतो.

2 बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, बागेत पाणी साचून राहिल्यास ते काढून द्यावे.

3 बऱ्याच वेळेला बागेला देत असलेली खते पाण्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात क्षार जमा झालेले असू शकतात तेव्हा ते पावसाच्या पाण्यात वाहून जातील असे व्यवस्थापन करावे. क्षार वाहून गेल्यामुळे पाण्याचा निथरा होऊन मुळांचे कार्यक्षेत्र पुन्हा एकदा मुळांच्या वाढीसाठी पोषक बनेल

4. .सेंद्रिय खते व हिरवळीच्या खताचा वापर करा.

खालील गोष्टी द्राक्ष बागाईत दारांनी टाळाव्या :

1. बागेतील इतर व्यवस्थापनाचे कामे करताना बोद तुडवू नये. बोद तुडवल्याने तेथील माती घट्ट होऊन मु

श्रीहरी. अ. घुमरे

ळांच्या वाढीत अडथळा निर्माण होतो .

 

2. शक्य असल्यास तणांचे व्यवस्थापन उशिरा करावे. किंवा टाळावे.

3. शक्यतोवर फवारण्या टाळाव्यात. गरज असल्यासच फवारणी करावी. जेणेकरून बागेतील आर्हता राखता येईल.

4. मुख्यता: ऑक्झीन सारख्या संजीवकाच्या फवारण्या टाळाव्यात.

श्रीहरी. अ. घुमरे   9921314560                             

LEAVE A REPLY

*