हतगड किल्ला प्रवेश बंदमुळे पर्यटकांमध्ये नाराजी

0

हतगड  ( वार्ताहर ): सुरगाणा तालुक्यातील पर्यटकांना बघण्यासाठी हतगड किल्ला असून सापुतारा गुजरात पर्यटन पासून ६ किलोमीटर हतगड किल्ला असल्याने सापुतारा येथे परराज्यातून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात हतगड किल्ला बघण्यासाठी येत असतात . परंतु सध्या पर्यटकांना किल्ल्यावर्ती जाण्यासाठी वन विभाग कडून प्रवेश बंद करण्यात आला आहे .त्यामुळे सापुतारा येथून पर्यटक हतगड ला येवून प्रवेश बंद मुळे नाराज होवून फिरून जात आहेत .त्यामुळे आता या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने सर्वत्र शुकशुक।ट दिसत आहे.

शासन निर्णयानुसार हतगड किल्ल्याचे संवर्धन व किल्ल्याचा परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती हतगड यांनी विविध कामे कार्यान्वित केली आहे. पर्यटन स्थळी प्रवेश शुल्क इतर शुल्क खालील प्रमाणे निर्धारित केली आहे. प्रवेश फी प्रति व्यक्ती (५ वर्ष पुढील ) १०रु, शालेय विद्यार्थी सहल अभ्यास ५ रु, २ व्हीलर पार्किंग १०रु, ४ व्हीलर पर्किंग २० रु, व्हिडिओ, फोटो. ३०० रु, इतका शुल्क ठेवण्यात आला आहे.

या शुल्क प्राप्त रकमेचा वापर पर्यटन स्थळ सुव्यवस्थापन देखभाल साफसफाई विकास कामासाठी वापर करण्यात येइल परंतु येथे प्रवेश बंद असल्यामुळे प्रवेश शुल्क मिळत नसल्याने किल्ल्याचे छोटे मोठे विकास कामाची गती थांबली आहे . तसेच येथे चौकशी रूम बांधण्यात आले आहे. त्याला ज्या दिवसापासून कुलुप लावला आहे, ते अद्याप खोलण्यात आला नाही.

पर्यटक बेकायदेशीर रित्या किल्ल्यात प्रवेश करतात, ज्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी नाकेबंदी केली आहे. तेथे तपासणीसाठी कोणीही अधिकारी येत नसल्याचे हतगड ग्रामस्थाकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*