ग्रामीण भागात रानभाज्या नामशेष होण्याचा धोका

0

मनवेल ता यावल (वार्ताहर ): ग्रामीण भागातल्या रानावनात आजही अनेक प्रकारच्या रानभाज्या पाहावयास मिळतात. रानभाज्यातील विविध गुणधर्मामुळे याना खूप मागणी असते. ग्रामीण भागात पावसाळ्यात रानभाज्याचा वापर आहारासाठी अधिक होत असतो मात्र यंदाचा पावसाळा अनियमीत होत असल्याने रानभाज्या दूर्मिळ होत आहेत. यासाठी आदिवासी जमात रानभाज्या साठी जंगल तुडविताना दिसत आहेत, परंतु ग्रामीण भागातही नामशेष होण्याचा मार्गावर दिसून येत आहे.

शहरी भागात या रानभाज्यांना अधिक मागणी असते परिणामी यातून आदिवासी कुंटुबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपल्बध होतो. जंगलात जाऊन रानभाज्या शोधून गावात शहरात विक्री करतात. त्याना रोजगार मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या खाण्याची चव ग्रामीण भागातील शेतमजुर व शेतकरी पावसाळ्या घेतात. या भाज्या नैसर्गिकरित्या वाढल्यामुळे त्या कडवट , तुरट असतात पण त्या खाताना चविष्ट लागतात. मात्र पावसाळा सुरु होऊन ही ग्रामीण भागात रानभाज्याची प्रतिक्षा कायम  आहे.

दूळीचे फुले व कर्टुले जूलै महीन्यात मोठ्या प्रमाणात उपल्बध होत असत मात्र अद्यापही  मिळवुन येत नसल्याची माहीती विक्रेत्याने दिली. श्रावण महिन्यात अंबाडीची भाजी, चिल्या ढोल्याची भाजी, चिवाईची भाजी ,पोथीचे पाने या भाज्या पावसाळ्या आहारात वापर केला जातो.

कर्टुले ह्या फळभाजीला ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही मोठी मागणी आहे मात्र दमदार पाऊस अद्यापही झाला नसल्यामुळे कर्टुले, दुळीचे फुले, फागड्याची पाने या रानभाज्याची प्रतिक्षा ग्रामीण भागात दिसुन येत आहे.

LEAVE A REPLY

*