पहिने परिसराला हिरवाईचे कोंदण ; पर्यटकांची गर्दी

0

नाशिक : त्र्यंबक शहरापासून जवळच असलेल्या घोटी-देवगाव रस्त्यावरील पहिणे घाटातील निसर्गसौंदर्य पहिल्याच पावसाने खुलले आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे या घाटातील लहान धबधबे, झरे जीवंत झाले आहेत. त्यामुळे रविवारची सुटी घालविण्यासाठी पर्यटकांची मोठी जत्रा या परिसरात भरली होती.

गेल्या दोन दिवसापासून पाऊस थांबला असला तरी पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. त्यामुळे पहिणे घाट परिसरातील डोंगरावर धुक्याची झालर आणि काही प्रमाणात छोटे छोटे धबधबे प्रवाही झाले आहेत. अधूनमधून अंगावर उडणारे तुषार आणि समोर पहूडलेला ब्रह्मगिरीमुळे विलोभनीय दृष्य पर्यटकांना आनंदी करीत होते. शनिवार, रविवार आणि सोमवार सलग सुटी आल्याने रिलॅक्स मुडमध्ये निसर्गसहलीचा आनंद घेण्यासाठी पहिणे पसिरास चांगली पसंती मिळाली आहे.

व्हिडीओ साभार : शिजू नायर (पर्यटक )

 

 

LEAVE A REPLY

*