नाशिकरोड रेल्वे स्थानकावर लवकरच ‘ऑक्सिजन पार्लर’

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर लवकरच ‘ऑक्सिजन पार्लर’

नाशिक : देशातील प्रमुख रेल्वे स्टेशनपैकी एक असणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थनाकावर लवकरच ऑक्सिजन पार्लर उघडणारा आहेत. भुसावळ विभागास या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून एनआयएनएफआरआयएस या योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनला काही दिवसांपूर्वी इंडियन स्टॅँडर्ड ऑर्गनायझेशन फॉर स्टॅन्डर्डायझेशन (आयएसओ) च्या मानांकनाने गौरविण्यात आले. सर्वच पातळीवर हे स्टेशन पर्यावरणपुरक असावे असावे, असा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्याअंतरंगातच हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दरम्यान या कराराअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 2/3 वर २५० चौरस फुटांच्या जागेमध्ये इनडोअर प्लांट गॅलरी कम सेल कियोस्क म्हणजेच ऑक्सिजन पार्लर उभारणार आहे. या प्लॅटफॉर्मवर नासाने प्रमाणित केलेले १८ एअर फिल्टर प्लांट बसविण्यात येणार आहे.

त्यामध्ये बांबू पाम, स्पायडर प्लांट, डेविल्स एव्ही, डॉर्फ डेट, बोस्टर्न फर्म, किम्बरले क्वीन फर्म, चायनीज सदाहरित, ब्रॉडलीफ लेडी पाम, बॅबरटन, डेझी, वेपिंग फीग, फ्लेमिंगो लिली, इंग्लिश एव्ही, व्हेरिगेटेड स्नेकी प्लान्ट, कॉर्नस्टाल्क प्लांट,रेड एजेड, पीस लिली, फ्लोरिस्ट क्रायॅसॅथेममअसे एअर फिल्टरिंग प्लांट्सचा समावेश आहे.

यामुळे वार्षिक उत्पन्नात यामुळे वाढ होणार आहे. तसेच या जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तर प्रवाशांच्या आरोग्यास आवश्यक असणारी नॅचरल हवा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दि. १५ रोजी नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी केली असून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com