५ जानेवारीला नाशिक मविप्र मॅरेथॉन

५ जानेवारीला नाशिक मविप्र मॅरेथॉन

नाशिक । मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 5 जानेवारीला 7 व्या राष्ट्रीय व 12 व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोड येथील मॅरेथॉन चौकातून या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून विविध 15 गटांमधून सहभागाची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.

मविप्र संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हयातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे मागील अनेक वर्षांपासून आयोजन करण्यात येत असते. प्रारंभीची काही वर्षे जिल्ह्यापुरती मर्यादित असणारी ही स्पर्धा राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील धावपटू नाशिकमध्ये हजेरी लावत असतात.

राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या सहकार्याने या मॅरेथॉनचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असून पुढील वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ती खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या सहभागाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी जिल्हयातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमी नागरिकांना स्पर्धेतील सहभागाबाबत आवाहन केले आहे. स्पर्धेतील प्राविण्यधारक सहभागींना बक्षिसे आणि सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

प्रवेशशुल्क व नोंदणी
ऑनलाईन नोंदणीसाठी www.nashikmvpmarathon.org हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्याशिवाय 9850849384 / 9850798483 / 9423176395 व 98908159976 या क्रमांकावर देखील नोंदणी करता येईल. खुल्या गटातील स्पर्धकांसाठी 500 रुपये तर इतर स्पर्धकांसाठी 100 प्रवेशशुल्क ठेवण्यात आले आहे.

असे असणार गटनिहाय
धावण्याचे अंतर
14 वर्षाआतील मुले – 4 किमी, मुली – 3 किमी,
17 वर्षाआतील मुले – 5 किमी, मुली – 4 किमी,
19 वर्षातील मुले – 10 किमी, मुली – 5 किमी,
25 वर्षाआतील मुले -12 किमी, मुली – 6 किमी
खुला गट (फुल मॅरेथॉन) 18 वर्षांपुढील पुरुष – 42. 195 किमी
खुला गट (हाप मॅरेथॉन) 18 वर्षांपुढील पुरुष – 21.097 किमी
खुला गट -25 वर्षांपुढील पुरुष – 10 किमी, महिला – 10 किमी
खुला गट-35 वर्षांपुढील महिला – 5 किमी
खुला गट- 60 वर्षांपुढील पुरुष – 4 किमी
खुला गट -75 वर्षांपुढील पुरुष – 3 किमी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com