यंदाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार डॉ. किसन महाराज साखरे यांना जाहीर

0

मुंबई : संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा सन 2017-18 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा डॉ.किसन महाराज साखरे यांना घोषित करण्यात आला.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 5 लाख रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य श्री मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*