मोबाईलचा अतिवापर उडवतोय तरुणांची झोप

0

नवी दिल्ली । आजच्या दैनंदिन जीवनात मोबाईलला असाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आजचे युगाचा जणू मोबाईल हा सोबती झालेला आहे. मोबाईलमध्येच अनेकांचे विश्व सामावलेले असते. २४ तासांपैकी ०८-०९ तासाचा कालावधी हा मोबाइलला दिलेला असतो. त्यामुळे अनेकजण रात्री -बेरात्री फोनलाच चिकटलेले असतात. चॅटिग आणि सर्फिंगच्या व्यसनात तरुण अडकले असून त्यांना निद्रानाश जडत असल्याचे एका संशोधनातून उघड झाले आहे.

त्यामुळे संशोधनातून ज्याप्रमाणे निदर्शनास आले आहे, त्यामुळे संशोधकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. आज स्वस्तात मिळणारे मोबाईल्स, स्वस्तात मिळणारा डेटाप्लॅन यामुळे मोबाइलधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मोबाईलच्या वाढत्या गतीमुळे तरुणांची झोप उडाली असून त्यांना आवश्यक असलेली झोपही मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर याचे घातक परिणाम होत आहेत.

आजच्या तरुणांना धावत्या जीवनशैली बरोबरच रोजच्या घडामोडी ही तितक्याच गतिमान झाल्या आहेत. मोबाईल वापरणारे तरुण झोपेच्या वेळेतही सर्फिंग आणि व्हिडिओ पाहत असतात. त्यामुळे कामाचा व्याप, रोजचा प्रवास, थकवा, पुन्हा रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर असल्याने शरीराला आवश्यक असलेली विश्रांती मिळत नसल्याने त्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दिवसभर मरगळल्यासारखे वाटणे, उत्साह कमी होणे, नैराश्य येणे, नकारात्मक विचार वाढणे यासारखे दुष्परिणाम रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर असणाऱ्यांमध्ये संशोधकांना आढळले आहेत.

याच दरम्यान इटलीच्या बोकोनी विश्वविद्यापीठातील संशोधकांनी तरुण वापरत असलेले मोबाईल, ब्रॉडब्रँडचा स्पीड आणि वापरकर्त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याचा अभ्यास केला. अनेक कपंन्या कमी किंमतीत स्वस्त डेटा आणि जास्त स्पीड देत असल्याने अनेक तरुणांना मोबाईल बंद करण्याचे भानच राहत नाही आणि हा मोहच त्यांना निद्रानाशाकडे नेत आहे, असे संशोधकांनी सांगितले. रात्रीची झोप शरीराला आवश्यक असल्याने सकाळी उशीरापर्यंत झोपूनही अनेकांची झोप पूर्ण होत नाही.

भारतातील ९३ टक्के युवकांची झोप कमी झाल्याचे संशोधनात म्हटले आहे. तर झोपेशी संबंधित आजार वाढत असून यासाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढली आहे. तर ५८ टक्के भारतीयांच्या आरोग्यावर आणि दिनचर्येंवर याचा परिणाम झाला आहे. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या प्रगत देशात हायस्पीड इंटरनेटमुळे तरुणांसह विद्यार्थ्यांनाही निद्रानाशाने विळखा घातल्याने दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

*