खुटवडनगर येथे सराफी व्यावसायिकवर हल्ला; सखोल चौकशी करण्याची मागणी

0
नवीन नाशिक : खुटवड नगर येथील रहिवासी असलेल्या सराफी व्यावसायिक व सराफ बाजारातील ‘पतोंडेकर ऍण्ड विसपुते ज्वेलर्स’चे संचालक विशाल विसपुते यांच्यावर काल मध्यरात्री राहत्या घरी प्राणघातक हल्ला झाला.

त्यांच्यावर मुंबई नाका येथील सोपान हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक नवीन नाशिक सराफ असोसिएशन ने पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडे केली असून मागणीचे निवेदन अंबड पोलीस ठाण्याचे व.पो.निरिक्षक मधुकर कड यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*