नांदगांव पंचायत समितीच्या सभापतीपदी विद्यादेवी पाटील

0

नांदगांव।दि.१२ प्रतिनिधी 

नांदगांव पंचायत समितीच्या सभापतीपदी सावरगांव गणातील विद्यादेवी एकनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली.सुमनताई निकम यांनी आवर्तन पध्दतीने मागील महिन्यात राजीनामा दिला होता. उपसभापती सुभाष कुटे प्रभारी सभापती काम पाहत होते.

सभापती निवडीसाठी गुरुवारी दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी भीमराज दराडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अर्ज स्वीकारण्याच्या निर्धारित वेळेत विद्यादेवी  पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला त्यांच्या अर्जाला भाऊसाहेब हिरे सूचक  होते.

प्रांताधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी भीमराज दराडे विद्यादेवी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे,  शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, उपसभापती सुभाष कुटे, सदस्य भाऊसाहेब हिरे, श्रावण गोरे,  सुमनताई  निकम, आशा आहेर, सुशीला नाईकवाडे, मधुबाला खिरडकर, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, माजी उपसभापती विलास आहेर, तालुकाप्रमुख किरण देवरे,  सुनील जाधव, अँड सचिन साळवे, अयाज शेख, शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*