Video : हरसूल येथे टारपी नृत्य करत आदिवासी दिन साजरा

0

हरसूल : जागतिक आदिवासी दिन गुरूवारी आदिवासी संस्कृती जतन करत उत्साहात साजरा झाला. यावेळी आदिवासी टारपी नृत्यासह इतर नृत्य सादर करून आदिवासींच्या संस्कृतीला वंदन करण्यात आले. टारपी हा आदिवासी लोकांचा नृत्यनाट्य प्रकार होय.

निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो. दुर्गम, डोंगराळ व जंगलमय प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने ९ आॅगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले आहे.

संपूर्ण देशासह आदिवासी बहुल त्रंबक तालुक्यात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला.हरसूल मध्ये आदिवासींनी तारपामधून निघणाऱ्या सुरांवर नृत्य केले . सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन घडविले.

LEAVE A REPLY

*