ज्ञानाचा प्रकाश म्हणजेच गुरुपौर्णिमा

0

गुरुपौर्णिमा विशेष : २७ जुलै २०१८ आषाढ पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवतो. किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत ,पुराणे लेखन केली. त्या व्यासमुनींना प्रणाम, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिवस आहे. त्यांच्याइतके जेष्ठ आचार्य किंवा गुरुवर्य याना वंदन करण्यासाठीचा हा दिवस असतो. धर्मशास्र्, नीतिशास्र, व्यवहारशास्र व मानसशास्र्या सारख्या अनमोल ग्रंथाना त्यांनी एका माळेत बांधले.

व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना पहिले वंदन करण्याचा प्रघात आहे. भारतात रामायण, महाभारत काळापासून गुरुशिष्य परंपरा चालत आलेली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो. याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करू शकतो. अशा गुरूंना आपण मन देतो. आदर, कृतज्ञता व्यक्त करणे हे आद्य कर्त्यव्य आहे.

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय परंपरेत गुरु शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये जनक यज्ञवाक्य, शुक्राचार्यजनक, कृष्ण-सुदामा, सांदिपनी- विश्वामित्र, राम-लक्ष्मण अशी हि गुरु शिष्य परंपरा आहे. भगवान कृष्णाने गुरूच्या घरी लाकूड वाहिले. ज्ञानेश्वरांनी वडिलांकडून निवृत्तीना आपले गुरु मानले. संत नामदेव विठ्ठलाशी भाष्य करीत असत. विसोबा खेचर नामदेवांचे गुरु होते. भारतीय संस्कृतीत गुरुलाच कायम पूजनीय मानले आहे.
गुरुपौर्णिमा सद्गुरूंची पौर्णिमा मानतात. म्हणजे प्रकाश गुरु शिष्यापासून देतात. तो ज्ञानाचा प्रकाश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा म्हणून गुरुची पूजा करायची असते.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात भरपूर पाणी आहे. पण घाटाने गहगरीने आपली मन खाली केल्याशिवाय विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. शिष्याने गुरूजवळ नम्र झाल्याशिवाय ज्ञान नाही हे कायम लक्षात ठेवायला हवे.
अनेक शाळा व कॉलेजमधून विद्यार्थी आपल्या गुरुजनांसमोर विनम्र भावनेने अंतमस्तक होतात.

गुरुर्र ब्रम्हा ! गुरुर्रविष्णू गुरुरदेव महेश्वरा !

शब्दांकन : सलील परांजपे, नाशिक. 9527247994

LEAVE A REPLY

*