नुकसानग्रस्तांना प्रशासन दाद देईना

0

निफाड : निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळलेल्या ‘सुखोई-30’ या लढाऊ विमान अपघाताने या परिसरातील सुमारे 7.31 हे. क्षेत्राचे नुकसान झाले. या नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. या घटनेत सुमारे 15 कोटी 65 लाख रुपयांचे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी प्रशासनाने हा अहवालच मान्य केला आहे.

शासन निर्णयानूसारच मदत दिली जाईल यापेक्षा अधिकचा मोबदला हवा असल्यास एचएएल प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सल्ला जिल्हाधिकारयांनी येथील नुकसानग्रस्त शेतकरयांना दिला. त्यामुळे नुकसान सहन करूनही शेतकरयांची कोंडी झाली आहे.

एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करताना तांत्रिक बिघाड होऊन कोसळले. या दुर्घटनेची एचएलच्या बंगळुरू येथील विषेश गुणवत्ता व नियंत्रण पथकाकडून चौकशी सुरू आहे. या अपघातामुळे संदीप ढोमसे, योगेश ढोमसे, विलास निकम, सुकदेव निफाडे या शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जेथे विमान अपघात घडला तो मळे परिसर असून या भागात मोठ्याप्रमाणावर फळबागा आहेत. शेतकरयांनी बँकांचे कर्ज काढून या बागा उभ्या केल्या आहेत.

येथील शेतमाल हा निर्यात केला जातो असे येथील शेतकरयांचे म्हणणे आहे.मात्र प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करतांना शासन निर्णयाचा आधार घेत मुल्यांकन केल्याने उत्पादन खर्चापेक्षाही अधिक तोकडी मदत शेतकरयांच्या हाती पडणार आहे. ही मदत शेतकरयांना मान्य नसून निर्यातीचा दर द्यावा अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकरयांनी केली आहे. यासंदर्भात आज शेतकरयांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली असता जिल्हाधिकारयांनी आपण नियमात राहून मदत देउ शकतो त्यापेक्षा वाढीव मदत हवी असल्यास एचएएल प्रशासनाची चर्चा करून तसे पत्र आणावे असे सांगितल्याने शेतकरयांनी प्रशासनाकडून एकमेकांकडून बोट दाखवले जात असल्याने नारजी दर्शवली आहे.

झालेले नुकसान
सुखोईच्या अपघातामुळे गोरठाण आणि वावी परिसरातील जवळपास 12 शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. यात विलास निकम यांच्या 2.3 हेक्टर डाळिंब बागेचे तब्बल 6 कोटी 40 लाख रुपयांचे नुकसान झाले, तर वावी येथील योगश ढोमसे यांच्या 1.31 हेक्टर द्राक्षबागेचे 4 कोटी 56 लाख रुपयांचे नुकसान झाले. सुखदेव निफाडे यांच्या 0.60 हेक्टर द्राक्षबागेचे 4 कोटी 61 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर वसंत जगताप, तानाजी ढोमसे, बाळनाथ पूरकर, अलका ढोमसे, संदीप ढोमसे, संजय ढिकले, विजय ढिकले, उमेश होलगडे, राजेंद्र रसाळ यांच्या शेतातील काकडी, टोमॅटो, मिरची, शेवगा पिकांचे 8 लाख 5 हजारांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

*