शेतकरी संपासाठी ३१ मेपर्यंत जिल्ह्यात जागृती

१ ते १० जूनपर्यंतच्या संपात दूध व भाजीपाल्यावर बंदी

0
नाशिक | दि. २१ प्रतिनिधी- सातबारा कोरा करा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह सात मागण्यांसाठी किसान क्रांती मोर्चाने हाक दिल्यानंतर येत्या १ जूनपासून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संपावर जाणार आहे. यात पहिले दहा दिवस शेतकरी शहराकडे दूध व भाजीपाला विक्रीस आणणे थांबवणार आहे. या संपासंदर्भात जिल्ह्यात शेतकर्‍यांसह विविध पक्ष, संघटना व मार्केट कमिटी याठिकाणी जागृती करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्याचे सत्र सुरूच असून कर्जमुक्तीसाठी विरोधकांसह महायुतीच्या सत्तेेत असलेल्या शिवसेनेने कर्जमुक्तीसाठी आग्रह धरला आहे. तरीही शासनाकडून पाऊलले उचलली जात नसल्याने आता शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले. आहे.

यात सातबारा कोरा करा, स्वामिनाथ्न आयोगाची अंमलबजावणी करा, दुधाला ५० रुपये हमीभाव द्या, कृषिपंपांची वीज मोफत द्या, शेतकरी वर्गास ६० वर्षांनंतर पेन्शन द्या व ठिबक सिंचनासाठी १०० टक्के अनुदान द्या आदी मागण्यांसाठी शेतकरी संपावर जाणार आहे.

या आंंदोलनाला किसान क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. येत्या १ जानेवारी पासून सुरू होणार्‍या शेतकरी आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात आज शहरातील पंडित कॉलनीतील गोदावरी बँकच्या गोदावरी हॉल येथे जिल्ह्यातील शेतकरी व कार्यकत्यार्ंंची बैठक झाली. यास जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत प्रथम जिल्हास्तरीय समन्वय समिती (कोअर कमेटी) गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर कोअर कमिटी व तालुका समितीत काही पदाधिकार्‍यांची नावांची निवड करण्यात आली असून अजूनही काही कार्यकर्त्यांची या समितीत निवड करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या समितीच्या वतीने सर्व तालुके व गाव पातळीवर जाऊन येत्या ३१ मेपर्यत जनजागृती केली जाणार आहे. यात गावात शेतकर्‍यांशी चर्चा करणे, सर्व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणे, सर्व मार्केट कमिटीत येणार्‍या शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी बैठका घेणे, आठवडे बाजार, गर्दीच्या बाजारपेठात जागृती करणे, जिल्ह्यातील विविध संघटनांशी चर्चा करुन त्यांना शेतकर्‍यांच्या भावना समजावून सांगणे, शिक्षक, कामगार यांच्याशी चर्चा करणे अशाप्रकारे जिल्ह्यात सर्व भागात शेतकर्‍यांच्या संपासंदर्भात जागृती करुन यात सहभागी होण्याचे आवाहन या समितीच्या वतीने केले जाणार आहे.

तसेच बैठकीत पहिले १० दिवस जिल्ह्यातील कोणीही शेतकरी आपला भाजीपाला व दूध शहराकडे घेऊन येणार नाही, यासंदर्भात रणनीती ठरविण्यात आली. लपून शहरात दूध व भाजीपाला घेऊन येणार नाही यावर लक्ष ठेवले जाणार अस्रून याकरिता काही कार्यकर्त्यांवर जबाबदारी देणार असल्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

LEAVE A REPLY

*