दिंडोरीत राजकीय भूकंप ; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा भाजपात प्रवेश

0

नाशिक : दिंडोरीतील नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने स्थानिक राजकीय पक्षांना चांगलाच झटका बसला आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व दिंडोरी लोकसभेचे खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

यामध्ये नगराध्यक्ष प्रमोद देशमुख उपनगराध्यक्ष आशा कराटे तसेच त्यांच्यासोबतच नगरसेविका देशमुख, निर्मला जाधव, नगरसेवक निलेश गायकवाड, तुषार वाघमारे आदींनी भाजपात प्रवेश केला आहे.

१५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश झाल्याने येत्या निवडणुकीचे गूढ वाढले आहे.

LEAVE A REPLY

*