निकुंभ, कुशारे, हांडोरे, भोसले ठरले भाग्यवान विजेते

'देशदूत तेजस पुरस्कार'

0

नाशिक : आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर उद्याचा स्वप्नवत भारत घडवण्याची उमेद बाळगून असलेल्या तरुणाईच्या रुंदावणार्‍या पंखांना उमेदीचे बळ देणार्‍या ‘देशदूत तेजस पुरस्कार : 2018’ उपक्रमात वाचकांचा प्रतिसादही वाढत आहे. पहिल्या दोन आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या यशोगाथांवरील प्रश्नांना अचूक उत्तरे देत भाग्यवान विजेते होण्याचा मान संध्या निकुंभ, गणेश दत्तात्रय कुशारे, उद्धव दिनकर हांडोरे आणि शशिकांत भोसले यांना मिळला आहे.

दि. 26 जुलै पासून ‘देशदूत तेजस पुरस्कारा’चा प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत तरुणाईच्या कर्तृत्वाची गाथा मुलाखत स्वरूपात प्रसिद्ध केली जात आहे. तरुणाईच्या विस्तारणार्‍या क्षितिजांना आकांक्षा अन् उमेदीचे पंख देणार्‍या ‘देशदूत’ उपक्रमात वाचकांनाही प्रश्नांची उत्तरे देऊन सहभागी होण्याची संधी देण्यात आली असून प्रसिद्ध झालेल्या यशोगाथेवरून वाचकांसाठी दर आठवड्याला एक प्रश्न विचारण्यात येतो. त्याची अचुक उत्तरे कुपनद्वारे भरून देणार्‍या वाचकांचा मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात येत असून त्यातील भाग्यवान विजेत्यांना बक्षीसे देऊन गौरवण्यात येते.

दि. 26 जुलै ते 29 जुलै या तसेच दि. 29 ते 5 ऑगस्ट या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या यशोगाथेवर आधारित विचारल्या गेलेल्या प्रश्नांची अचुक उत्तरे देणार्‍या वाचकांचा लकी ड्रॉ द्वारेे मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला. त्यामध्ये पहिल्या आठवडतील पहिला भाग्यवान विजेता होण्याचा मान नाशिकच्या संध्या निकुंभ रा. गडकरी चौक यांना मिळाला. गणेश दत्तात्रय कुशारे, मु. पो. कुंदेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक हे द्वितीय भाग्यवान ठरले.

दुसर्‍या आठवड्याती पहिला भाग्यवान विजेते होण्याचा मान उद्धव दिनकर हांडोरे, विहितगाव, नाशिक यांना मिळाला. शशिकांत केशव भोसले, सरोळेखुर्द ता. निफाड हे दुसरे भाग्यवान वाचक ठरले.
नव्या ऊर्जेला सलाम करणार्‍या देशदूत तेजस पुरस्कार-2018 या चिरतरुण ‘तेजस’ उपक्रमातील यशोगाथा वाचकांसाठीही प्रेरणादायी ठरत असून यानंतरही वाचनकांना भरपूर बक्षीसे जिंकण्याची संधी उपलब्ध असून यशोगाथेवर आधारीत प्रश्नांना अचूक उत्तरे देत आकर्षक बक्षीसे जिंकता येणार आहेत.

LEAVE A REPLY

*