Video : ‘देशदूत तेजस पुरस्कार’ युवा पिढीसाठी ऊर्जादायी ; तरुणाईच्या प्रतिक्रिया

0

नाशिक | आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर उद्याचा स्वप्नवत भारत घडवण्याची उमेद बाळगून असलेल्या तरुणाईच्या पंखांना उमेदीचे बळ देणार्‍या ‘देशदूत तेजस पुरस्कार : 2018’ उपक्रमाला वाचकांसह नाशिककर तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाने युवा वर्गाला सशक्त व्यासपीठ मिळत असून युवापिढीमध्ये उमेद, ऊर्जा भरली जात असल्याच्या प्रतिक्रिया तरुणाईने ‘फेसबुक लाईव्ह’ या उपक्रमातून व्यक्त केल्या.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची पायरी गाठणार्‍या आणि समाजासाठी योगदान देणार्‍या युवकांना ‘देशदूत’ने देशदूत तेजस पुरस्काराच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा प्रकाराचा हा पहिलाच उपक्रम असून पुरस्कारासाठी 11 श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या तरुणांकडून प्रवेश अर्ज मागवून प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून पुरस्काराचे नामांकन ठरवण्यात आले.

या उपक्रमासंदर्भात तरुणाईला बोलते करण्यासाठी तसेच त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘देशदूत फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून काही प्रश्न विचारण्यात आले. युवा पिढीची सद्य परिस्थितीतील वाटचाल, त्यांचा स्वभाव, जीवनशैली, आदर्शवाद, मूल्ये, वागणूक या बद्दल प्रश्न विचारण्यात आली. त्याची उत्तरे सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘लाईव्ह’ घेण्यात आली.

आजच्या युवकांनी सोशल मीडियाचा वापर हा आपल्या कामापुरता करणे आवश्यक आहे. तरुणाई अधिक वेळ मोबाईलर घालवते. हा अतिवापर टाळण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा वापर योग्य माहितीचा प्रसार करण्यासाठी करावा. आपण किती वेळ सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर करतो आणि तो कशासाठी करतो, याचा विचार व्हावा, अशा प्रतिक्रिया तरुणाईने दिल्या.

हल्ली तरुणाईचा पालकांशी संवाद कमी झाला आहे. त्यातून नात्यामध्ये अंतर वाढत असून गैरसमज निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे युवावर्गाने पालकांशी संवाद साधात अडचणी, समस्या याबाबत पालकांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचें आहे. पालकांनी मुलांना संस्कारांची शिदोरी दिली तर ते वाईट गोष्टीपासून परावृत्त होऊन देशाच्या विकासाला हातभार लावतील, असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ
‘देशदूत तेजस पुरस्काराच्या माध्यमातून तरुणाईला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सशक्त व्यासपीठ मिळाले आहे. हा स्तुत्य उपक्रम असून दरवर्षी युवावर्गाच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा असा कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. या उपक्रमातून युवापिढीला मार्गदर्शन, प्रेरणा मिळणार असून सुप्तगुणांना अभिव्यक्त होण्यासाठी नवे आकाश मिळणार आहे, अशा सूर प्रतिक्रियेतून उमटला.

LEAVE A REPLY

*