एक ‘हजारी’ मनसबदार आता सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट होणार

0

कल्याण : आता शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रिकेटमध्ये तब्बल १००९ धावा करुन विश्वविक्रम करणारा कल्याणचा प्रणव धनावडे प्रेरणा ठरणार असून सीबीएसई अभ्यासक्रमात प्रणवच्या या विश्वविक्रमाचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे.

२०१६ साली शालेय क्रिकेटमध्ये खेळताना प्रणव धनावडेने तब्बल १००९ धावांची खेळी खेळली होती. त्यावेळी जागतिक पातळीवर त्याच्या या विश्वविक्रमी कामगिरीची नोंद घेण्यात आली होती. यानंतर दोन वर्ष आपल्या खेळात व्यस्त असलेला आणि फारसा प्रकाशझोतात नसलेला प्रणव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात प्रणवच्या विश्वविक्रमी कामगिरीवर आधारित धड्याचा समावेश करण्यात आला आहे.

हा धडा इयत्ता तिसरीच्या हिंदीच्या पुस्तकात घेण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्याच्या प्रवासातून प्रेरणा मिळणार आहे. याबाबत खुद्द प्रणवला कुठलीही कल्पना नव्हती. त्याच्या मित्रांनी फोन करुन त्याला याबाबत माहिती दिल्यानंतर त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सगळ्यानंतर आपली जबाबदारी वाढली असून भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल, असे प्रणवने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*