रिक्षाद्वारे प्रबोधनाचा जागर मांडणारा अवलिया : भगवान मराठे

0

नाशिक | गोकुळ पवार  समाजात वावरत असताना आपण समाजाचं काही देणं लागत असतो. त्यामुळे प्रत्येक मनुष्य कोणत्यातरी मार्गाने समाजच हे देणं चुकवत असतो. काही व्यक्ती प्रत्यक्ष समाजात जाऊन काम करत असतात काही आपल्या कामातून वेळ काढून काम करत असतात. असाच एक नाशिकचं अवलिया भगवान मराठे.

समाजत प्रबोधन घडवायचं असेल तर एखादा सम्यक मार्ग निवडणे आवश्यक असते, नाकी, प्रत्यक्ष जाऊन काम करणे. त्याचप्रमाणे भगवान मराठे हे रिक्षा चालवतात. परंतु त्यांच्या रिक्षाच्यावर असणाऱ्या विविध मार्गदर्शक फलकामुळे एकप्रकारे नागरिकांचे प्रबोधन होताना दिसत आहे. एखाद्या ज्ञानवंताप्रमाणेच अगदी रिक्षा चालवण्याच्या कष्टाच्या धंद्यातील एक सामान्य रिक्षावाला देखील समाजाला शहाणे करण्याच्या प्रयत्नात प्रबोधनाच्या वाटेने जाऊ शकतो. याचे उदाहरण म्हणजे नाशिक शहरातील भगवान मराठे आणि त्यांची बोलकी रिक्षा !

रिक्षाचालक म्हंटल की, प्रवाशांशी वाद घालणारा, अवैध प्रवासी वाहतूक करणारा, गैरवर्तन करणारा, उद्धट अशी ओळख निर्माण झालेली आहे. मात्र नाशिकचे भगवान मराठे हे रिक्षाचालक प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याबरोबरच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करत आहे. नाशिक येथील पवननगर परिसरातील रहिवासी असलेले भगवान दादा उत्तमनगर ते सीबीएस दरम्यान प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय गेल्या १० ते १२ वर्षांपासून करत आहे.

बरीच माणसं असा विचार करतात की आपल्या व्यस्त कामकाजातून समाज कार्य करणं म्हणजे अशक्य गोष्ट… पण भगवान दादाची बोलकी रिक्षा पाहिली की हा गैरसमज कायमचा दूर होतो. त्यांनी आपल्या व्यवसायातूनच प्रबोधनाचा जागर मांडण्याचं काम हाती घेतलय. भगवान दादाची रिक्षा बोलकी आहे… ती यासाठी की ही रिक्षा कायम कुठल्यातरी सामाजिक विषयावर बोलत असते… कधी रस्ते सुरक्षा या विषयावर तर कधी बेटी बचावचा नारा देत, तर कधी शहिदांना श्रद्धांजली देताना तर कधी तरूणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देत, भगवान दादाची रिक्षा कायम आपल्या बोलक्या फलकांच्य़ा माध्यमातून बोलत असते. भगवान मामा यांची सामाजिक संदेश लिहिण्याची शैलीही खास आहे. आजपर्यंत अनेकांनी त्यांच्या सामाजिक संदेशांमधून धडा घेत स्वत:ला बदलवण्याचा प्रयत्न केलाय…

सध्या पावसाचे दिवस असल्याने तरुण तरुणी अनेक धोकादायक ठिकाणी सेल्फी काढताना दिसून येतात, यावर त्यांनी आपल्या रिक्षावर मार्गदर्शक फलक लावला आहे तर नुकताच पोलादपूर, आंबेनळी या घाटात अपघात झाला यात बसमधील ३२ लोकांचा मृत्यू झाला. यावरही त्यांनी श्रद्धांजलीपर फलक लावून सामाजिक बांधिलकी जोपासली.

त्यांच काम जरी छोटं करीत असले तरी यातून समाजावर होणारा सकारात्मक परिणाम फार मोठा आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची आपल्याला जेव्हा जाणीव होते तेव्हा समाजासाठी काहीतरी विधायक काम नक्की करावं, इतका साधा विचार यामागे ते करतात. दादांना प्रेरणा देणारी घटना म्हणजे एकदा त्यांचा मुलगा आजारी पडला तेव्हा मुलाच्या उपचारासाठी त्यांना कुणीही मदत केली नाही, दारोदार भटकून थकलेल्या भगवान दादांना त्यावेळी एका साध्या मजूराने १००० रूपयांची मदत केली, ती त्यांच्यासाठी लाखमोलाची ठरली आणि तिथूनच त्यांनी ठरवलं ते समाज प्रबोधन करायचं. तेव्हापासूनच दादांची रिक्षा बोलायला लागली, समाजप्रबोधनाचे धडे द्यायला लागली.

दैनंदिन जीवन जगात असताना आपल्याही आपल्याही आयुष्यात असे अनेक घटना घडतात ज्यामुळे आपल्या लक्षात येते कि, आपणही समाजासाठी, गरजुंसाठी, अनाथ मुलांसाठी काहीतरी करायला हवं, पण हा विचार प्रत्यक्षात आणणंही तितकंच महत्वाचं आहे. जे भगवान दादांनी करून दाखवलंय. तेव्हा आपणही समाजच काय तरी देणं लागत या भावनेतून भगवान दादांच्या बोलक्या रिक्षाचा आदर्श घेऊया आणि चांगल्या कामासाठी स्वतःपासून सुरवात करूया. कारण ०१ का माणसाने १०० पाऊलं टाकण्यापेक्षा १०० माणसं मिळून एक पाऊल टाकूया, समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करू या…

 

LEAVE A REPLY

*