लेखक तुमच्या भेटीला उपक्रमाचे आयेाजन 4 ते 20 ऑगस्ट दरम्यान

0

नाशिक, दि.1, प्रतिनिधी – सालाबादप्रमाणे यंदाही ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक तुमच्या भेटीला उपक्रमाचे आयेाजन 4 ते 20 ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे 18 वे वर्ष आहे.

शुक्रवारी (दि.4) या उपक्रमास प्रारंभ होणार असून पहिले पुष्प संगीत समीक्षक सत्यशील देशपांडे हे गुंफणार आहे. ते ख्याल : एक आकलन या विषयावर प्रात्यक्षिकासह आपले मौलिक विचर मांडतील.

5 ऑगस्ट रोजी पत्रकार जयप्रकाश प्रधान ऑफबीट भटकंती आणि बातमीमागची बातमी या विषयावर जगातील सफरींची अदभूत अशा लघुफितींसह रसिकांशी संवाद साधणार आहेत. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका प्रफुल्ला मोहिते या महिलांचे सबलीकरण आर्थिक, भावनिक, शारिरीक आणि वैचारिक या विषयावर 6 ऑगस्ट रोजी मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवारी (दि. 11) भारत भारती ट्रस्टचे विनय पत्राळे भगवदगीता सर्वांसाठी या विषयावर विचार मांडतील. वाईन उद्योगातील कर्तबार वाईन लेडी अचला जोशी आपली यशोगाथा माडणार आहेत.

17 ऑगस्ट रोजी त्यांचे व्याख्यान होईल तर 18 ऑगस्ट रोजी डॉ सचिदानंंद शेवडे हे त्यांची नवीन लेखनकृती इस्लामी आघातांवर हिंदूंचा प्रत्याघात यावर प्रकाशझोत टाकतील. शनिवारी (दि.19) सुप्रसिध्द वास्तुशास्त्रज्ञ डॉ. रविराज अहिरराव आणि रेकी ग्रॅण्ड मास्टर व वास्तुशास्त्रज्ञ मंजुश्री अहिरराव ‘कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक यशासाठी वास्तुशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

20 ऑगस्ट रोजी या उपक्रमाची सांगता होणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील हे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर भारतीय लोकशाहीचा प्रवास कोणत्या दिशेने या विषयावर आपले मत मांडतील.

या उपक्रमातील सर्वच व्याख्याने शंकराचार्य न्यासाचे कुर्तकोटी सभागृह, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड येथे संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहेत. यासाठी सर्वाना प्रवेश खुला आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अयोजक वसंत खरैनार व शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी व कार्यवाह प्रमोद भार्गवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*