रोहिण्या तापू लागल्या; आता प्रतीक्षा मॉन्सूनची

0

त्र्यंबकेश्वर, ता. २७ : रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर परिसरात शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीला सुरवात केली असून अनेकांची जमीन भुजणी झाली आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वत रांगेत पांढरे ढग जमायला सुरुवात झाली असून हवाही सुटली आहे.

पारंपरिक संकेतानुसार मोसमी पाऊस जवळ आल्याचा हा संकेत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. सर्वांनाच मॉन्सूनची प्रतीक्षा आहे.

 

हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार लवकरच मॉन्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकणार असून यंदा नाशिक परिसरात वेळेवर पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साही वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*