जिल्हयात साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नूकसान

11 हजार शेतकरी बाधित - कांदा, डाळिंब बागांना फटका

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
जिल्हयात झालेल्या अवकाळी पाउस आणि गारपीटीने सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नूकसान झाले असून यामुळे 11 हजार 371 शेतकरी बाधित झाले आहेत.

तर 1269 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नूकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे प्रस्ताव मदतीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने इगतपुरी, निफाड , बागलाण , कळवण , देवळा , सिन्नर या तालुक्यांना चांगलेच झोडपले.वादळी वारयासह झालेल्या पावसाने पशुधनाचीही हानी झाली.

नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानूसार आज या नूकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. जिल्हयात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नूकसान झालेल्या तालुक्यांमध्ये बागलाण तालुक्यात अधिक फटका बसला आहे.

तालुक्यातील 10 हजार 686 शेतकरयांचे 3116 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नूकसान झाले. यात डाळिंब, कांदा , भाजीपाला , टोमॅटो पिकांचे नूकसान झाले. निफाड तालुक्यातील 237 हेक्टर शेतीक्षेत्राचे नूकसान झाले असून यामुळे 328 शेतकरी बाधित झाले आहे.

देवळा तालुक्यातील 91.4 हेक्टरवरील पिकांचे नूकसान झाले. कळवण तालुक्यातील 131 शेतकरयांचे 70 हेक्टरवरील नूकसान झाले आहे. 72 गावामध्ये 33 टक्क्यांपेक्षा अधिक नूकसान झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट होते. तर 78 गावांतील 1269.6 हेक्टरवरील 3173 शेतकरयांचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नूकसान झाले आहे.

पिक निहाय नूकसान
अवकाळी पावसाने डाळिंब बागांचे मोठे नूकसान झाले आहे. 1346.96 हेक्टरवरील डाळिंब बागांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. तर द्राक्ष 70.3 हे., टोमॅटो 300 हे. , कांदा 1247 हे. , मका 16 हे., मिरची 17.2 हे , भाजीपाला 581.1 हे , असे एकूण 3575.58 हेक्टर क्षेत्राचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक नूकसान झाले.

LEAVE A REPLY

*