खा. दानवेंच्या निषेधार्थ छत्रपती सेनेतर्फे ‘जोडे मारो’ आंदोलन

0

नवीन नाशिक, (प्रतिनिधी) ता. १२ : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना येथे कार्यकर्त्यांशी केलेल्या वक्तव्याचा आज सकाळी पाथर्डी फाटा येथे छत्रपती सेनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला.

खा. दानवे यांच्या प्रतिमेला यावेळी छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या.

या आंदोलनात छत्रपती सेनेचे अध्यक्ष  चेतन शेलार, निलेश शेलार, तुषार गवळी, मंगेश धोंडगे, राजेश पवार, सागर पवार, राज गुंजाळ, सागर बोराडे, मुकेश पाटील, धीरज खोळंबे आदींसह छत्रपती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ छत्रपती सेनेच्या वतीने पाथर्डी फाटा येथे जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

*