हॉटेलवर धाड, दारुसाठ्यासह एक तरुणी पोलिसांच्या ताब्यात

0
नाशिक / पंचवटी परिसरातील मुंबई- आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल करवली येथे पोलिसांनी धाड टाकली.

यात एका बंगाली तरुणीसह हॉटेलमध्ये अवैधरित्या विक्रीसाठी असलेला दारुसाठाही पोलिसांनी जप्त केला आहे.

पंचवटी परीसरातील मुंबई- आग्रा महामार्गालगत हॉटेल करवली येथे अवैद्यरित्या दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती.

या गुप्त माहितीच्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आणि एका 23 वर्षाच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*