नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

0
नाशिक | प्रतिनिधी : येथील  जुन्या पोलीस आयुक्तालयापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये आज शनिवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला.
तिबेटीयन मार्केटमध्ये झालेला हा स्फोट अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ज्या गाळ्यात हा स्फोट झाला तिथे सिलिंडर आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहेया स्फोटात १० गाळ्यांचे नुकसान झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*