मिसेस महाराष्ट्र २०१८ सौंदर्य : स्पर्धा नाशिकच्या गौरी पाठक ‘गोल्डन हार्ट’ किताबाच्या मानकरी

0

नाशिक : कलागुण, बुद्धिमत्ता व सौंदर्य यावर आधारित मिसेस महाराष्ट्र २०१८ सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या गौरी पाठक यांनी “गोल्डन हार्ट” हा किताब पटकावला. पाठक यांच्या या सन्मानामुळे सौंदर्य स्पर्धेत नाशिककर महिलांचे वर्चस्व कायम ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

राज्यातील विवाहीत महिलांसाठी विनय अर्हना संस्थेच्या वतीने मिसेस महाराष्ट्र २०१८ स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात काल पार पडली. हॉटेल हयात येथे झालेल्या या स्पर्धेत नाशिकमधून निवड चाचणीत पात्र ठरलेल्या सौ. गौरी पाठक यांची अंतिम स्पर्धसाठी निवड झाली होती.

या स्पर्धेत राज्यातील तब्बल ४० महिलांचा समावेश होता. ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. सिल्व्हर आणि गोल्ड स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. ज्यात भाषा कौशल्य, फिटनेस, कॅमेरा फेसिंग, मिडिया, स्टायलिंग, मेकअप, रॅम्प वॉक, स्टेज फियर, ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, आत्मविश्वास आणि परीक्षकांच्या प्रश्नांना अचूक उत्तरे अशा विविध टप्प्यांवर ही स्पर्धा झाली.

यात सर्वात मोठा हातभार स्पर्धेचे मुख्य आयोजक अंजना मॅस्कॅरेनस, कार्ल मॅस्कॅरेनस, श्रद्धा रामदास यांचा लाभला. पूजा सिंग, मधू रणजित सिंग यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.

परीक्षक म्हणून अभिनेत्री युक्ता मुखी, रितू शिवपुरी, विनय अर्हना, अशोक धामणकर आणि हयातचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत कुमार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अमन वर्मा यांनी केले.

सर्वांचे हृदय जाणून स्वतः गोल्डन हार्ट जपण्याची कला असणाऱ्या गौरी पाठक यांना “मिसेस महाराष्ट्र २०१८ गोल्डन हार्ट” किताबाने यावेळी सन्मानित करण्यात आले. याबद्दल गौरी पाठक यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

श्रीमती पाठक ह्या रोटरी क्लबच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रोजच्या दैनंदिनी व्यापात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतानाच स्त्रीला स्वतःला सिद्ध करता येते, हा संदेश त्यांनी पुरस्काराच्या माध्यमातून दिला.

LEAVE A REPLY

*