दिंडोरी तालुक्यातील सोनजांबच्या शेतकर्‍याचा संशयास्पद मृत्यू

0
नाशिक | प्रतिनिधी : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील ४० वर्षीय शेतकरी शरद विष्णू संधान यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

दि. ९ ऑगस्ट रोजी शरद विष्णू संधान हे दुपारी चार वाजल्यापासून घरातून अचानपणे बेपत्ता झाले होते. ते घरात दिसत नसल्याने परिवाराने त्यांचा शोध घेतला. परंतू ते आढळून न आल्याने त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांचा तपास सुरू होता.

दरम्यान आज दि. १२ रोजी त्यांच्या घरापासून दिड किलोमिटर अंतरावर असलेल्या एका विहिरीत त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वणी येथील शासकीय रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी दाखल केला आहे. याबाबत तपास सुरू आहे.

त्यांच्या मागे १ मुलगा, १ मुलगी, आईवडील असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*