शिरवाडे फाट्यावर बस-क्रुझरच्या अपघातात पाच महिलांसह 8 ठार

0

पिंपळगाव बसवंत/शिरवाडे वणी । वार्ताहर : आज शिरवाडे फाट्यावर झालेल्या  भीषण अपघाताने बागलाण तालुक्यातील किकवारी ,मुंजवाड़ व् डांगसौन्दाने गावावर शोककळा पसरली किकवारी येथील लग्नानिमीत्त नाशिक येथे जानाऱ्या लग्नाच्या गाडीचा हा अपघात झाल्याने किकवारी येथील चार मुंजवाड़ येथील दोन तर डांगसौंदाने येथील एका महिले वर काळाने झड़प घातल्याने या भीषण अपघातात गाडीच्या चालकासह एकूण आठ जणांचा मृत्य झाला आहे

शिरवाडे वणी फाटा धोतरखेडे शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर कु्रझर जीप रस्त्याने जात असतांना ती रोड डिव्हायडरला धडकून शेजारून जात असलेल्या सटाणा बसवर आदळली.

बस व रोड डिव्हायडर यांच्यात ही जीप चेंडूसारखी टोलवली गेली. यामुळे आवाज होताच बस चालकाने बस थांबवली. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोेंडी झाली होती.

जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. काही जणांवर पिंपळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघातातातील मृतांची नावे

1) धनुबाई केदा काकुळते 65 किकवारी ( सटाणा)

2) रत्ना राजेंद्र गांगुर्डे, 45 डांगसौदाणे

3)तेजश्री साहेबराव शिंदे, किकवारी

4) कृष्णाबाई बापु शिंदे, किकवारी

5)सरस्वतीबाई नथु जगताप, किकवारी

6)अशोक पोपट गांगुर्डे, कळवण

 

संवेदनशीलता हरवत चालली आहे का?

माणसाचे मन खूपच हळवं असत हे आपण नेहमी अनुभवतो. अगदी टेलिव्हिजन वरती एखादे मनाला लागणारे दृश्य चालू असेल तरी अनेकांचे डोळे पणवतात मात्र आजची घटना पाहता कुठेतरी आपली संवेदनशीलता हरवत चालली आहे का? असा प्रश्न मनात घर करून गेला.

आज एका अपघाताचे फोटो दिवसभरात जवळजवळ माझ्याकडे असलेल्या (अपवाद वगळता) सर्वच ग्रुप वरती आले.फोटो पाहून मन सुन्न झाले. आणि पुढच्या क्षणी मनात विचार आला की ह्या अवस्थेतील फोटो मृत वेक्तीचे नातेवाईक, घरातील सदस्य यांनी पाहिले तर? त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार आपण न केलेलाच बरा.

तसा विचार करायचाच असेल तर त्या ठिकाणी आपण स्वतः त्या घरातील सदस्य आहोत असा करावा, तेव्हा कळेल की आज आपण किती मोठी चूक करून बसलो. असा अनुभव या पूर्वीही मला नेहमी येत असतो. आज मात्र राहवले नाही आणि सर्व ग्रुप वरती एक संदेश पाठवला की असे फोटो टाकू नये. परिणामी ज्यांनी फोटो पाठवले त्यांना त्यांची चूक लक्षात आली व पुन्हा असे घडणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगत अनेकांनी आपल्या कडून न कळत झालेली चूक मान्य केली. परंतु मित्रांनो खरच आपल्यातील संवेदनशीलता हरवत चालली आहे का? असा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. व भविष्यात आपल्याकडून अशी चूक होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी.

-बाबा पवार 

LEAVE A REPLY

*