तामसवाडी शिवारात बिबट्या जेरबंद

0

निफाड |  तामसवाडी येथील भगवान आरोटे यांच्या गट न 410 मधील ऊसाचे शेतात लावलेल्या पिजऱ्यात बिबटया जेरबंद झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने या परिसरात दहशत बसविली होती अनेकांना दर्शन देत बिबट्याने शेळ्या मेंढ्या कुत्रे कोल्हे डुकरे वासरे यांचा फडशा पडला होता परिणामी वनविभागाने मंगळवार दि 4 रोजी या परिसरात बिबट्याचे ठसे घेत याठिकाणी पिंजरा लावला होता आज मंगळवार दि 11रोजी पहाटे भक्ष शोधण्याच्या नादात बिबट्या पिजऱ्यात शिरला अन अलगद अडकला बिबट्या पिजऱ्यात अडकताच त्याने डरकाळ्या फोडून आसमन्त दणाणून सोडला.

बिबट्या पिजऱ्यात अडकल्याची वार्ता परिसरात समजताच बिबटया पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी पोलीस पाटील पांडुरंग शिंदे समाधान आरोटे दीपक आरोटे बाळू गीते पप्पू खाडे नारायण वैद्य यांनी या घटनेची माहिती वनविभागाला काळविताच वनविभागाचे संजय भंडारी विजय टेकणार भेय्या शेख शिंदे वैद्य हे घटनास्थळी दाखल झाले.

आज सकाळी या बिबट्याला निफाड च्या वनउद्यानात आणण्यात आले पकडलेला बिबट्या नर असून तो सहा वर्षाचा आहे आज सायंकाळी त्यास जगलांत सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाचे संजय भंडारी यांनी म्हटले आहे

LEAVE A REPLY

*