Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

समृध्दी महामार्गाचा फांगुळगांवला फटका : खोदकामामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर

Share

इगतपुरी  |  वार्ताहर  :   इगतपुरी तालुक्यातुन मुंबई नागपुर समृध्दी महामार्ग जात असुन या मार्गाचे फांगुळगांव जवळ जमीनी खालुन १३ कीलो मीटर बोगद्याचे काम चालु आहे. शासनाने या कामासाठी ब्लास्टींगची मर्यादा ठरवुन दिलेली आहे. मर्यादेनुसार ब्लास्टिंग करावी असा आदेश असतांना सुध्दा सदर ठेकेदार या ठीकाणी जास्त प्रमाणावर मर्यादेपेक्षा अतिरीक्त ब्लास्टींग करत असल्याने आजु बाजुच्या घरांना मोठे तडे गेले आहेत. तर ठीक ठीकाणी मातीचे ढिगारे साचले असल्याने गेल्या दोन दिवसांपासुन पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे फांगुळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने फांगुळगावकडे रस्ता बंद झाला आहे. तर नागरीकांच्या घरात व येथील शाळेत पाणी शिरल्याने नागरीकांचे व विद्यार्थीचे चांगलेच हाल होत आहे.

या ब्लास्टींगचा फटका येथील रहीवासी प्रकाश आडोळे व महादु आडोळे यांच्या घरांना बसला असुन त्यांच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. याबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी इगतपुरी तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन निवेदनने दिली आहेत. मात्र समृध्दी महामार्गाचे अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

समृध्दी महामार्गासाठी येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने ऐन पावसाळ्यात फांगुळगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साठत असल्याने इगतपुरीकडे जाण्यासाठी नागरीक, विद्यार्थी व वाहन धारक यांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागत रस्ता वारंवार बंद होत आहे. येथील बरेच विद्यार्थी व विद्यार्थीनी कॉलेज व शाळेसाठी याच एकमेव रस्त्याचा वापर करीत असल्याने शालेय शिक्षण घेण्यासाठी हाल होत आहे. म्हणुन रस्त्यावरील मातीची ढिगारे त्वरीत हटवुन रस्ता मोकळा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

समृध्दी महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे या भागातील रस्त्यावर नेहमी पाणी साठत असल्याने इगतपुरीला जाण्यासाठी नागरीक, विद्यार्थी व वाहन धारक यांना त्रास होत आहे. समृध्दी महामार्गाच्या प्रशासनाने वेळीच दगड व माती हटवुन रस्ता सुरळीत करण्यात यावा.
धनराज म्हसणे, ग्रामस्थ फांगुळगाव

 समृध्दीच्या या कामामुळे आमच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असुन ऐन पावसाळ्यात घरे गळत असुन भिंतीनांही ओल आल्याने कधी भिंत पडेल याचा नेम नाही. ओल्या भिंतीमुळे यावर विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असुन जिवीतहाणी झाल्यास याला जबाबदार कोण रात्री झोपेत सुध्दा झोपतांना या घरांमधे झोपतांना भीती वाटते.
 प्रकाश आडोळे, पिडीत ग्रामस्थ.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!