कर्मवीरांच्या प्रयत्नातून निसाकाची पायाभरणी

0

निफाड – तालुक्यात त्याकाळी गहू, बाजरी, हरभरा ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात. या पिकांबरोबरच शेतकरी उसाला महत्त्व देऊ लागले.

परिणामी गावागावांत गुर्‍हाळे निर्माण झाली. मात्र याच उसाची साखर बनवली तर शेतकर्‍याला दोन पैसे मिळतील आणि परिसराचा विकास होईल या उदात्त भावनेने कर्मवीरांनी निसाकाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.

जुने जाणते एकत्र आले अन् मग जागा निश्चित झाली. कारखाना उभारणीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

कर्मवीर काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, माधवराव बोरस्ते, मालोजीराव मोगल, विठ्ठलराव हांडे, प्रल्हाद पा. कराड या समाजधुरिणांनी पिंपळस, सुकेणा, पिंप्री शिवारातील सुमारे 263 एकर क्षेत्र निसाकासाठी अधिग्रहीत केले.

गावोगाव फिरून भागभांडवल उभे केले अन् प्रजासत्ताकदिनी म्हणजेच 26 जानेवारी 1961 रोजी निसाकाची स्थापना केली. (रजि. क्रं. 284) सहकाररुपी उभारणी होत असलेल्या या कारखान्याचे संस्थापक चेअरमन म्हणून भाऊसाहेब हिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

परिसरातील शेतकर्‍याची मुले नोकरदार म्हणून कामावर रुजू करून घेण्यात आले. तज्ञ कामगार नियुक्त केले गेले.

 

LEAVE A REPLY

*