Type to search

नाशिक

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत

Share

हतगड | दि. २० |  लक्ष्मण पवार  :  सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथ्यावरील बोरगाव येथील धरण कोरडे ठणठणीत झाले आहे.

जून चा तिसरा आठवडा सुरु झाला तरी पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत .बोरगाव परिसरातील घोडंबे,बोरगाव, पोहळी, पासोडीपाडा,हिरीडपाडा,हतगड ,आदी गावांना पाणी देणार सुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडेठाक झाले आहे.

पूर्ण पणे पाण्याने तळ गाठला असून केवळ पूर्ण धरणात सगळीकडे गाळच गाळ दिसत आहे. या धरणात गाळाचे प्रमाण वाढल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी होत असते.  त्यामुळे हे धरण जून महिना पर्यंत पूर्ण कोरडे ठणठणीत होऊन जाते . तरी या धरणात पाण्याची क्षमता वाढावी म्हणून शासन कृषी ,महसूल ,जलसंपदा आदी विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी बोरगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.या आठवड्यात पाऊस न आल्यास या परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होईल शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!