Type to search

नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदिवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे

Share

मुंबई  :   महाराष्ट्र राज्य मधील आदिवासी समाजाच्या व वसतिगृह,आश्रम शाळा,एकलव्य इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन आमदार बच्चूभाऊ कडू व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी आदिवासी विकास विभाग च्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना दिले.

या आहेत मागण्या

महाराष्ट्र राज्यातील आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळा मध्ये विद्यार्थ्यांना निवासी वाढीव क्षमता वाढवावी व इगतपुरी, त्रिम्बकेशवर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, त्यांना रहाण्यासाठी वसतिगृहात प्रवेश मिळावा , नाशिक शहरामध्ये विभागीय वसतिगृह असल्याने विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षे वाढ होत आहे त्यामुळे नाशिक मध्ये वसतिगृहाची संख्या वाढवून विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश व पेठ येथे ही वसतिगृहाची संख्या वाढवून प्रवेश मिळावा.

आश्रमशाळा, एकलव्य इंगजी माध्यमच्या शाळांचे 10 वी ,12 वी चे निकाल खूपच कमी गुणवत्ते त लागलेले आहेत त्यामुळे तेथील मुख्याध्यापक व संबंधीत यांच्या वर तात्काळ कार्यवाही करून शाळांची गुणवत्ता वाढवावी, आदिवासी वस्तीगृहांमध्ये आहराकरिता लागू असलेली डी बी टी योजना तात्काळ बंद करून पूर्ववत आहाराची व्यवस्था करावी.

महाराष्ट्र राज्यातील वस्तीगृहांमध्ये व आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावर असल्याने तेथे तात्काळ सी सी टी व्ही केमेरे लावावे व सुरक्षा रक्षक ची नेमणूक करावी. डॉ पायल तडवी यांच्या नावाने महाविद्यालयीन रॅगिंग व अट्रोसिटी ऍक्ट नावाचा महाराष्ट राज्यात लागू करावा. नागपूर जिल्हा परिषदे ने आदिवासी समाजाचे शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे यांना निलंबीत केलेले आहे. त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे व विविध समस्या सोडविण्या संदर्भात निवेदन देण्यात आले .

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य युवा कार्याध्यक्ष गणेशभाऊ गवळी, अमरावती सचिव रमेश तोटे, नाशिक युवा जिल्हा अध्यक्ष बाळा भाऊ पाडवी, सा कार्यकर्ते संजू बाबा भुरकुड, सा कार्यकर्ते सनिल पगारे, भारत मालगवे, संजय दुगल व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!