Type to search

maharashtra नाशिक माझं नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगरला सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या ला अटक

Share
इंदिरानगर । नाशिक | वार्ताहर : राजीव नगर झोपडपट्टी परिसरात एक युवक हातात धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवत असताना इंदिरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव नगर झोपडपट्टी येथे दि( 5 )चार वाजेच्या सुमारास संशयित आरोपी किशोर उर्फ हाबऱ्या नारायण बाशिरे वय (२६) राहणार राजीवनगर झोपडपट्टी हा रस्त्यावर हातात धारदार शस्त्र बाळगून मोठ्याने शिवीगाळ करून एकेकाचा मुडदा पाडतो अशी धमकी देत दहशत निर्माण करीत होता त्याच वेळी तेथे पोलीस आले असता पोलिसांना पाहून तो पळू लागला.

त्याला तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित असलेले पो ना टोपले पो कॉ भगवान शिंदे व नागरिकांच्या मदतीने थोड्या अंतरावर पाठलाग करून पकडले असता त्याने उडवाउडविचे उत्तर दिले त्याच्या अंगी झडतीत पोलिसांना एक स्टीलचा सूरा आढळूण आला दरम्यान पो ना राजू राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विरोधात ३७(१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!