पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक राष्ट्रवादीतर्फे गाडी ढकलो आंदोलन

0
नाशिक  | प्रतिनिधी : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
पेट्रोल व डिझेल महाग झाल्याने त्याचे भाव परवडत नाही हे दर्शविण्यासाठी दुचाकी वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नेऊन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष  सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्याने महागाईचा दर वाढला आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली. त्यामुळे “ अच्छे, दिनचे ” स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तसेच दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे महागले आहे.
याचा निषेध करण्यासाठी महिलांनी बंद गाडी ढकलत संदेश दिला की अशा प्रकारे प्रवास करण्याचे दिवस आले आहेत. तसेच परदेशात विद्यार्थ्यांना पेट्रोल व डिझेल वर स्टुडंट डिस्काऊट उपलब्ध आहे. अशी सुविधा भारतातही देण्यात यावी. या मागण्या करण्यासाठी मोठया प्रमाणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व महिलांनी  एकत्रित येऊन जिल्हा प्रमुख प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाने हे आंदोलन केले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रूड ऑईलचे दर घसरले असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत.  पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने नक्की कोणाला सुखाचे दिवस येणार आहेत हे सरकारने जनतेला सांगावे हे आवाहन बलकवडे यांनी केले.
राज्यात दुष्काळ जाहीर न करता, पेट्रोल-डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी घेतला जातोय आणि ज्या शेतकर्यांच्या नावाखाली ही लूट सरकारने चालवलीये त्या शेतकर्यांना कर्जमाफी ही मिळत नाही . केंद्र व राज्य सरकारने याची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असा इशाराही आंदोलकांनी  घोषणा देऊन सरकारला दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शोभा साबळे, युवती जिल्हाध्यक्ष प्रतिक्षा बिल्लाडे, विद्यार्थी अध्यक्ष दीपक वाघ, प्रशांत बच्छाव, महेश भामरे, सायरा शेख,  अनिता भामरे, पुष्पलता उदावंत, कोमल निकाळे, ज्योती भोर, संजिवनी गायकवाड, हिराबाई साळवे, पुनम बर्वे, योगिता आवारे, वैशाली देवगिरे, मंजुषा महेश, रुपाली आहेर, गायत्री झांजरे, अंकिता पवार अदिंसह असंख्य महिला उपस्थित होत्या.

पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी वाहने ढकलून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

LEAVE A REPLY

*