पोलिसी बडगा, जनजागृतीचा नाशकात परिणाम विघ्नहर्त्याचे स्वागत डीजेविना

0
नाशिक । दि.26 प्रतिनिधी – शहरातील गणेशोत्सव पूर्णपणे इकोफ्रेंडली, डीजेमुक्त करण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन, डीजे वाजवल्यानंतर जास्त आवाजाचे गुन्हे दाखल करण्याचा बडगा या सर्वांच्या परिणाम शहरभर काही अपवाद वगळता श्रीगणेशाचे डीजेमुक्त स्वागत झाल्याचे चित्र पहावयास मिळालेे.
गुरुवारी वर्षाधारांच्या स्वागतात श्रीगणेशाचे सर्वत्र आगमन झाले. शहरात सकाळी 7 पासून ते रात्री उशिरापर्यंत घरगुती तसेच मंडळांच्या गणेशमूर्ती वाजत-गाजत विराजमान झाल्या.

गणरायाच्या स्वागताला मंडळांनी यंदा प्रामुख्याने ढोल पथकांना प्राधान्य दिल्याचे चित्र होते. शहरातील रस्त्या रस्त्यांवर पारंपरिक वेशभूषेतील ढोलपथके, तसेच पारंपरिक वाद्य, ढोल, ताशे, हलगी, सनई यांचा वापर मंडळांनी केल्याचे दिसत होते. आज दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जनातही हेच चित्र होते.

मागील वर्षी गणपती बाप्पा मोरया..च्या गजरात कार्यकर्ते डीजेच्या तालावर थिरकत असल्याचे सर्वत्र चित्र होते. या आवाजामुळे कानठळ्या बसल्याचे अनेकांना जाणवले.

मात्र, धार्मिक उत्सव असल्याने कोणीही त्याबद्दल तक्रार केली नाही. पण, डीजेच्या दणदणाटाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यावर कडक भूमिका घेतली आहे.

त्यानंतर प्रशासनही कामाला लागले असून त्यांनी आवाजाला मर्यादित ठेवण्यासाठी गणेश मंडळांच्या बैठकांमधून जनजागृती केली आहे. तर दुसरीकडे याचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई करण्याचा बडगाही उचलला आहे.

 

LEAVE A REPLY

*