Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महापालिकेची शेवटची सभा तहकूब; १२२ नगरसेवकांपैकी सातच उपस्थित

Share

नाशिक : महापालिकेची महासभा कोराम अभावी तहकूब करण्यात आली असून महापौर रंजना भानसी यांच्या कार्यकाळातील ही शेवटची महासभा होती.

महापौर, उपमहापौर या निवडणुकीच्या निमित्ताने बहुतांश नगरसेवक सहलीला बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आजच्या महासभेला १२२ नगरसेवकांपैकी केवळ ०७ सातच नगरसेवक उपस्थित होते..सभेला हजार होते. यामुळे हि महासभा महापौर भानसी यांना तहकूब करावी लागली.

या महासभेत महापौर भानसी यांना सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करता आले नाही. तसेच या महासभेत काही महत्वाचे प्रस्ताव असतांना त्यावर तांत्रिक अडचणीमुळे निर्णय घेता आले नाही.

दरम्यान सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापौर उपमहापौर निवडणूक येत्या २२ डिसेंबर रोजी होत असून नगरसेवक सहलीला गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेची शेवटची सभा तहकूब करावी लागली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!