Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लासलगाव : उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल सात हजार रुपये; कांद्याने केला रेकॉर्ड ब्रेक

Share

लासलगाव : लासलगाव बाजार समितीत गुरुवारी कांद्याने केला रेकॉर्ड ब्रेक केला असून उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल सात हजार रुपये तर लाल कांद्याला ५ हजार ८५० रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे.

दरम्यान या मोसमात कांद्याच्या दरवाढीचा हा उच्चांक असल्याचं मानलं जात आहे. लासलगाव सोबत नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यात ही कांद्याला भाव मिळत आहे. कांद्याची आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले. यामुळे चाळीतील कांदा सडला तर तर उन्हाळ कांद्यावरही परिणाम झाला. त्यामुळे कांद्याची यंदा आवक कमी होऊन मागणी वाढली. परंतु पुरवठा कमी असल्यानं कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळाली.

त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कांदा दर नियंत्रणासाठी १.२ लाख टन कांदा आयात करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे भडकलेला कांदा लवकरच हाळी येण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!