Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लासलगाव : कांद्याच्या बाजार भावात वाढ; उन्हाळ कांद्याला ‘लाली’

Share

लासलगाव : उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात येत असताना अवकाळी पावसाने लाल कांद्याची झालेली नुकसान त्यामुळे बाजारात लाल कांद्याची आवक मंदावल्याने मागणीच्या तुलनेत देशांतर्गत पुरवठा होत नसल्याने कांद्याच्या बाजार भावात दररोज चढ-उतर दिसत आहे लासलगाव बाजार समितीत या हंगामातील उच्चांकी असा प्रतिक्विंटलला उन्हाळ कांद्याला 6 हजार 301 रुपये इतका तर लाल कांद्याला 5 हजार 500 रुपये इतका बाजारभाव मिळाला या वाढत्या बाजार भावाबद्दल कांदा उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले

लासलगाव बाजार समितीत 80 वाहनातून 913 क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली त्याला उच्चांकी असा जास्तीजास्त 6301 रुपये , सरासरी 5875 रुपये तर कमीतकमी 2002 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला तर 57 वाहनातून 660 क्विंटलची आलेल्या लाल कांद्याला उच्चांकी असा 5500 रुपये बाजार भाव मिळाला आज लाल कांद्याने या हंगामातील पाच हजार रुपयांचा टप्पा पार करत जास्तीजास्त 5500 रुपये, सरासरी 5100 रुपये तर कमीतकमी 2581 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला

मागील वर्षी उन्हाळ कांद्याचे वाढलेले उत्पादन त्यामुळे कांदा उत्पादकांना अक्षरशः 50 ते 100 रुपये प्रति क्विंटल इतक्या मातीमोल बाजार भावाने कांद्याची विक्री करावी लागली होती यंदा मात्र दुष्काळी परिस्थितीतून टॅंकरने पाणी पुरवठा करून उन्हाळ कांद्याचे घेतलेले उत्पादन हे कमी प्रमाणात असतानाही मागील वर्षाप्रमाणे मातीमोल कांदा बाजार भावाने विक्री करावा लागू नये यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांनी हजार ते पंधराशे रुपयांनी कांदा मोठ्या प्रमाणात विक्री केला.

उर्वरित कांदा हा गरजेनुसार विक्री करण्यासाठी चाळीत साठवून ठेवला होता मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने चाळीतील कांदाही सडला आणि शेतात लावलेला लाल कांद्याचे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात उन्हाळ कांद्याची आवक ही आता दोन ते तीन टक्के शिल्लक राहिलेल्या उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून तर लाल कांद्याची झालेल्या नुकसानीमुळे बाजारात लाल कांद्याची आवक मंदावल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहे

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 25 ते 30 हजार क्विंटलची कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झाली होती यंदा मात्र हजार ते पंधराशे क्विंटल कांद्याची आवक दाखल होत असल्याने लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या बाजार भावाने साठी पार केली असून तर लाल कांद्याने या हंगामात उच्चांकी असा बाजार भाव घेत पन्नाशी पार केली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्या पर्यंत असेच कांद्याचे चढे बाजार भाव राहणार असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले

परतीच्या अवकाळी पावसाने लाल कांद्याचे झालेले मोठे नुकसान दुष्काळी परिस्थितीमुळे कमी प्रमाणात उन्हाळ कांद्याचे आलेले उत्पादन त्यामुळे बाजारात कांद्याचे वाढलेले भाव पाहता कमी प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याने फार कमी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे मात्र चांगला पाऊस झाल्याने पुढील येणारे कांद्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात असणार आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने कुठलेही चुकीचे निर्णय घेऊ नये जेणेकरून कांद्याची निर्यात होणार नाही आणि त्यामुळे परदेशी बाजारपेठा आपण गमावून बसू आणि त्याचा थेट परिणाम हा कांद्याच्या बाजार भावावर होऊन त्याचा फटका हा कांदा उत्पादकांना बसल्याशिवाय राहणार नाही यासाठी एक ते दोन महिने कांद्याचे बाजार भाव चढे राहिल्यास त्याचा आरडाओरडा करू नये अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी मंगेश गवळी यांनी केली आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!