Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कांदा फोडणी महागली; दर ८० रुपयाच्या घरात

Share

नाशिक : पावसामुळे कांदे खराब झाल्याने व साठवून ठेवलेला कांदा शिल्लक नसल्याने बाजारात मागणी वाढली आहे परंतु आवक घटल्याने कांद्याच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे सामान्य नागरीकांच्या जेवणाची चव महागली असून कांद्याने गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

दरम्यान परतीचा पाऊस थंडावला असला तरी पिकांची नासधूस झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. यामुळे कांद्याचे उत्पादन घटले असल्याने घाऊक बाजारपेठेत मागणी वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात कांद्याची घसरण झाली असली. तरी सामान्य नागरिकांना कांदा महाग मिळणार आहे. साधारण ७० ते ८० रुपये किलो दराने कांदा विक्री किरकोळ बाजारात होत आहे.

शेतकऱ्यांनी साठवुन ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याने अगदी काही कांदा शिल्लक असल्याने आवकही घटली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कांदा रडवणार असल्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!