दिलासादायक : लासलगावचे सगळे अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक : लासलगावचे सगळे अहवाल निगेटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी 

लासलगाव येथील करोनाग्रस्त रुग्णाच्या सर्व नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी लासलगाव येथील एका युवकाचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन त्यांचा तपासणी अहवाल पाठविण्यात आला होता.

दरम्यान, सर्व नातलगांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे लासलगाव पंचक्रोशीसह संपूर्ण जिल्हाभरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

जिल्हा रुग्णालयात रविवारपर्यंत २९ करोना संशयित रुग्ण दाखल झाले होते. या सर्वांचे स्वँबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

यापैकी एकोणावीस अहवाल काल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, आज दोन अहवाल प्राप्त झाले तेही निगेटिव्ह आले आहेत.  हे सर्व अहवाल लासलगाव येथील कोरोना पोझिटिव्ह नातेवाईकांचे असलाचे समजते. यानंतर काल सायंकाळपर्यंत नव्याने ७ संशयित दाखल झाले आहेत. तर २३ जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com