Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विद्युत पोलवर काम करतांना शॉक लागल्याने कर्मचारी गंभीर

Share

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील सबस्टेशनचा विद्युत कर्मचारी ऑपरेटर फिडर मध्ये काम करीत असताना जबरदस्त शॉक लागून शिडीवरून जमिनीवर कोसळल्याची घटना घडली आहे. धनराज जगन्नाथ राऊत असे विद्युत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की लखमापूर येथील सबस्टेशन येथे दुपारी एक वाजे दरम्यान राऊत हे विद्युत खांबावर काम करीत असताना जबरदस्त शॉक लागून शिडीवरून खाली दुर फेकले गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले असून यावेळी खाली कोसळल्याने अजुनच भयंकर मार लागला. त्यामुळे त्यांची प्रकृती अजुनच गंभीर झाली. त्यांना ताबडतोब नाशिक येथे व्हिजन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब घटनेची माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती पहाता लवकर त्यांना उपचारासाठी नाशिक ला खाजगी रुग्णालयात हालविण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!