Type to search

Breaking News दिनविशेष नाशिक मुख्य बातम्या

अस्मितेची ज्योत पेटवणारा पहिला आदिवासी महानायक : क्रांतिवीर बिरसा मुंडा

Share

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहारच्या रांची जिल्ह्यात उलीहातू गावात झाला. त्यांनी हिंदू व ख्रिस्ती या दोन्ही धर्माचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या २५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक शोषणाला आळा घालण्याची मदत केली. त्या काळातील भगतसिंग बिरसाच होते, ज्यांना इंग्रजी सत्ता सर्वात जास्त घाबरत होती. बिरसा यांनी त्यांना मिळालेल्या अतिशय अल्प आयुष्यात आदिवासींना एकत्र आणून बंडाचे सूत्र तयार केले व आवाज उठवण्याचे राजकारण शिकवले. म्हणूनच बिरसा मुंडा यांना केवळ झारखंडचेच नव्हे तर संपूर्ण समाज व देशाचे नायक म्हणून ओळखले जाते.

बिरसा मुंडा यांचा पेहराव साधा असला तरी ते या पेहरावातून लोकांना यातून परिवर्तन दिसावं या हेतून ते धोती तीन रंगात वापरायचे. सकाळी सफेद, दुपारी पिवळा व दुपार नंतर पुन्हा पांढरा व संध्याकाळी निळा यावरून लोकांना वाटायचे की बिरसाचे रंग परिवर्तनाकडे घेऊन जाणारे आहेत त्यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास प्रति दिन वाढत चालला होता. मुंडा समाजामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा पहिला आदिवासी महानायक म्हणून बिरसाचे सर्वत्र गुणगान करण्यात येऊ लागले.

बिरसा म्हणतात ” चावल की शराब पीना छोड दो । इसके पीने से ही हमारी जमीनें चली गई। हमारी शराब पीने और सोते रहने की आदत अच्छी नही हैं। शराब गंदे चावलो से बनाई जाती है । यह शरीर और जीवन का क्षय करती हैं। ज्यादा पीने वाला का हाल जानते हो क्या होता है? वे रास्ते में पडे रहते है, शराब से तुम्हारी इंद्रिया शिथिल हो जाती है, तुम लकडी की तरह पसर जाते हो । तुम्हारे परिवार के लिए रोटी नहीं होती । तुम्हारे बच्चे चिल्लाते है खाने के लिए । अशी असंख्य लोकगीतातून बिरसाने उलगुलानची हाक देऊन ब्रिटिशांशी निकराने लढा उभा केला .

बिरसा मुंडा यांनी तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उलगुलान केले. पहिले उद्दिष्ट होते पाणी, जंगले, जमीन यांसारख्या संसाधनांचे रक्षण करणे. दुसरे उद्दिष्ट होते स्त्रीचे रक्षण आणि संरक्षण आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे त्यांना आपल्या समाजाच्या संस्कृतीच्या मर्यादा टिकवून ठेवायच्या होत्या. राँची जेलमध्ये असतांना त्यांचा  मृत्य ९  जून १९०० रोजी मृत्यू झाल्याची माहिती मिळते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ झारखंड सरकारने विमानतळ,रेल्वे स्टेशन आणि विश्व विद्यालय यांना बिरसा मुंडा नाव देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

बिरसा मुंडा यांची समाधी राँचीमध्ये कोकर जवळील डिस्टिलरी पुलाजवळ आहे. त्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. बिरसाच्या जन्मदिनी झारखंड राज्याची नव्याने निर्मिती झाली. हिच बिरसाच्या कार्याला सलामी होय. बिरसा यांनी आदिवासी समाजाला जागृत करून ब्रिटिश सत्ता व प्रशासकीय यंत्रणेला कडाडून विरोध करणारा सर्वात कमी वयाचा आदिवासी क्रांतिवीराचा इतिहास भविष्यात हजारो पिढ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.

Tags:

1 Comment

  1. धन्यवाद देशदूत परिवार…
    बिरसा मुंडा जयंतीदिनी आपण या छोटेखानी लेखातून दूर्लक्षित असलेल्या त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली…

Leave a Comment

error: Content is protected !!