Photogallery : किर्लोस्कर महोत्सवात वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

0

नाशिक : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बुधवारी (दि. 5) मेट भूजबळ महाविद्यालयात एकदिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मेटचे ट्रस्टी दिलीप खैरे यांच्या हस्ते या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी फेस्टिवल डिरेक्टर वीरेंद्र चित्राव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महोत्सवाची माहिती दिली.

सदर छायाचित्र प्रदर्शनात जगभरातून मागवण्यात आलेल्या सुमारे 25000 छायाचित्रांमधून निवडण्यात आलेल्या निवडक 150 छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. यात वन्यजीव छायाचित्रांचा समावेश असून सृष्टीच्या प्रक्रियेत महत्वाचे सरहान असलेल्या फुलपाखरापासून जिराफ सारख्या महाकाय प्राण्याच्या छायाचित्रांचा यात समावेश आहे.

फार्मसी विद्यालयाचे प्राचार्य क्षीरसागर यांनी महाविद्यालयाची पर्यावरण संवर्धनाबाबत संसाठीची भूमिका मांडली. आडगाव येथील संस्थेच्या आवारात 40 टक्के भूमीवर वृक्षारोपण करण्यात आले असून वसुंधरा इको रेंजर्स उपक्रमात संस्थेच्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग राहील याची ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*