Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

खेडगाव : म्हणून शरद पवार यांनी खेडगावची वाट धरली…

Share

खेडगाव : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे आज नाशिकहुन कळवण, सटाणा येथे जात असताना खेडगाव येथील द्राक्ष उत्पादक बाळासाहेब बाबुराव दवगे याच्या द्राक्ष बागेची पाहणी करून सदर शेतकऱ्यास तसेच उपस्थित सर्व शेतकरी बांधवाना आधार दिला.

गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील सर्वच भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सर्वात मोठे नुकसान हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. खेडगाव परिसरातील बहुतांश द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून या पिकांसोबत हातातोंडाशी आलेले मका, सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले आहे.

मका, बाजरी सोयाबीन पिकांच्या शेतात बहुतांश सोंगण्या झालेल्या असल्यामुळे सोंगलेले पीक आज पाण्यात भिजलेले पाहायला मिळत आहे. जिल्हा दौऱ्यावर असलेले शरद पवार खेडगाव मार्गावरून जात असताना कादवाचे कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवळ, मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील, एनडीसीसीबँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी केलेल्या विनंतीमुळे शरद पवार हे खेडगाव येथील शेतकरी बाळासाहेब बाबुराव दवगे यांच्या ०१ हेक्टर द्राक्षबागाचे १०० टक्के नुकसान झालेल्या बागेची पाहणी केली.

त्यावेळी शरद पवार यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडुन द्राक्षबागचे सविस्तर माहिती घेतली. द्राक्षबाग कधी छाटली, केलेल्या उत्पादन खर्च , आता शिल्लक किती राहिली , पुढील हंगामातील नियोजन कसे करणार आदि माहीती घेऊन उपस्थित सर्व शेतकरी वर्गास नैराश्य येऊ देऊ नका असा मोलाचा सल्ला देऊन गेले. यावेळी परिसरातील पदाधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

दुष्काळ परिस्थिती पाणी टंचाईवर मात करून द्राक्षबागांना पोटाच्या पोरासारखे जपले. परंतु महिन्यापासुन ऐन छाटणी हंगाम सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने द्राक्षबागाचे १०० टक्के नुकसान झाले असून आता आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-बाळासाहेब दवंगे, द्राक्ष उत्पादक शेतकरी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!