Video : डुबेरे येथे खंडोबाच्या यात्रोत्सवाला उदंड प्रतिसाद

0

डुबेरे | वार्ताहर : येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव आज (दि.६) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
सकाळी ८.३० वाजता देवाला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. भिका नामदेव वाजे यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. सरपंच सविता वारुंगसे, उपसरपंच अनिल वारुंगसे, पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे, माजी सरपंच रामनाथ पावसे, माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर ढोली, शरद माळी यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर आ. वाजे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रथाचे विधीवपूजन करण्यात आले. वाजत गाजत संपूर्ण गावातून खंडेरायाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत घोड्यांचाही सहभाग होता. यात्रोत्सवाच्या रेलचेलीमुळे परिसर भारावून गेला असून रात्री भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर वाघे मंडळींचा रात्रभर जागरचा कार्यक्रम पार पडेल. यात्रोत्सवात रहाटपाळणे, खाऊची व खेळण्यांची दुकाने थाटण्यात आलेली आहे.

या दुकानांवर खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे. गावात मोठा यात्रोत्सव सुरु व्हावा अशी अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी आता फलद्रूप होतांना दिसू लागली असून मोठ्या हौसेने ग्रामस्थ, महिला या यात्रोत्सवात सहभागी होऊन आनंदद्विगुणीत करीत आहे.

यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सुभाष वाजे, शांताराम गुरुळे, जयराम वारुंगसे, किसन वाजे, दादा वाजे, पुंजा वारुंगसे, तुकाराम वाजे, बबन पवार, अमोल भुजबळ, अमोल वाजे, मंगेश वाजे, योगेश वाजे, निवृत्ती वाजे यांच्यासह यात्रोत्सव समितीचे सदस्य परिश्रम घेत आहे.

उद्या कुस्त्यांची दंगल
यात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर ढोली यांच्या पुढाकारातून उद्या (दि.७) दुपारी ४ वाजता कुस्त्यांची दंगल भरविण्यात येणार आहे. कुस्त्यांच्या दंगलीत विजेत्या मल्ल्यांवर बक्षीसांची खैरात होणार असून जिल्हाभरातील नामवंत पहिलवान या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे. कुस्ती शौकीनांनी यावेळी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन ढोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*