Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागील बांधकामाचा दगड ढासळला

Share
पंचवटी : शहरातील पंचवटी आणि जुने नाशिक परिसरात धोकादायक वाडे, इमारती पडण्याच्या घटना होत असताना आज येथील पुरातन श्री कपालेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेला मंदिर बांधकामातील दगड निखळून पडल्याची घटना झाली. श्रावण महिन्याच्या आज पहिलाच दिवस असतांना ही घटना झाली मात्र यात सुदैवाने कुठलीही दुर्घटना झाली नाही.
रामकुंड परिसरातील प्रसिध्द कपालेश्वर मंदिराच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि.२) मंदिराच्या मागील बाजूच्या वरच्या भागात असलेला, बांधकामातील एका नाक्षीचा दगड दुपारी १२ वाजेच्या सुमारास निखळून पडला. यासुमारास मंदिर प्रदक्षिणा मारत असलेले दक्षिण भारतीय पर्यटक भाविक अवघे तीन चार सेकंद पुढे जात नाही तोच हा दगड पडला असल्याचे प्रत्यक्षदर्शी अनिल कोठुळे यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने दगड पडलेल्या भागात लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले.
दरम्यान, कपालेश्वर मंदिर अधिक संरक्षित व्हावे यासाठी पुरातत्व विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. या मंदिराचे बांधकाम वेगळ्या पद्धतीने असल्याने केवळ एकमेकांच्या खाच्यात बांधलेले आहे. अनेक ठिकाणी मंदिराचे दगड खिळखिळे झाले असून, याबाबत पुरातत्व विभागास कळविण्यात येणार असल्याचे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!