Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे चंदन चोरीचा प्रयत्न फसला

Share

कळवण : तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावरील शेताच्या बांधावरील व शेत मळ्यातील घरासमोरील चंदनाच्या झाडांच्या चोरीचे सत्र सुरूच आहे. पाळे येथील सुनिल उखा पाटील व कुणाल संजय पाटील यांच्या घरासमोरील चंदनाची झाडे अज्ञात चोरटयांनी कापली असून त्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला आहे.

तालुक्यातील जुनीबेज, नाकोडा, कळवण, मानूर, पाळे, आसोली या गिरणा नदीकाठच्या गावातून यापूर्वीही चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. तक्रार करूनही वनविभागाला अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. चोरट्यानां पकडण्यात अपयश आले आहे. हे चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चंदनाच्या झाडाला छिद्रे पाडून झाडाचा गाभा तपासून घेतात मगच झाड कापून घेऊन जातात.

चंदन चोरट्यांचा तालुक्यात सुळसुळाट झाला आहे. असाच प्रकार तालुक्यातील पाळे येथे घडला आहे. येथील शेतकरी सुनिल उखा पाटील व कुणाल संजय पाटील यांच्या राहत्या घराच्या आवारातील चंदनाची झाडे अज्ञात चोरटयांनी मध्यरात्रीच्या सुमारास कापली होती. मात्र सुनिल पाटील मध्यरात्रीच्या सुमारास शेतातली पिकांना पाणीदेण्यासाठी उठले असता. चोरट्याना त्यांच्या घराबाहेर येण्याचा आवाज आला असता कापलेले झाड जागेवरच सोडून पसार झालेत. चंदनाचे झाड कापल्याचे श्री पाटील यांच्या सकाळी उजेडात लक्षात आले.

कळवण तालुक्यात पुनंद व गिरणा नदीच्या काठालगत असलेल्या शेतातील बांधावर अनेक चंदनाची झाडे आहेत. या झाडांची सर्रास चोरी सुरु आहे. वनविभागाकडे तक्रारी करूनही अद्यापपर्यंत या चोरट्याने जेरबंद करण्यात वनविभाग व रात्रीच्या गस्तीसाठी असणाऱ्या पोलिसांना अपयश आले आहे. वनविभागासोबत रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनीही या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवानी केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!